शिक्षणाचा बाजार
मराठी शाळा बंद
चालू शिक्षणाचा बाजार
इंग्रजीत चालतो यांचा
अर्थपूर्ण व्यवहार
हत्यार नवं यांच
पैसा कमवन्याच
नाव दिल त्याला
आधुनिक शिक्षणाच
झाल डोक रिकाम
वाढलं पाठीवरच ओझ
घराघरात शिरला आज
इंग्लिश मीडियम चा क्रेझ
पैश्यासाठी हा फक्त पैश्यासाठी
गल्लोगल्ली दोन शाळा सांगा कशासाठी
खेळू नका खेळ चिमुकल्यांच्या भविश्याशी
फक्त आणि फक्त तुमच्या खिशासाठी
बंद करा शिक्षणाचा बाजार आता बंद करा
शिक्षणाच्या नावाखाली पैसा खान बंद करा
आता विषय काढतो मी इंजिनीरांचा
शिकल्या सवरलेल्या बेरोजगरांचा
चार वर्ष आम्ही साला घास घास घासली
सबमिशन च्या नावाने रात रात जागली
चंद्र झाला डोक्याचा केस नाही राहिली
तरी आम्हा जॉब ची कृपा नाही लाभली
अरे लागली ना वाट आमची शॉट झाली ज़िंदगी
होती मोठी स्वप्न त्याची झाली राखरंगोळी
अपेक्षा आई बापाची करील मी मोठ काही
कस सांगू बाबा मला अजुनही जॉब नाही
एजुकेशन लोन चे थकलेत हो हफ्ते
नको तसे विचार येतात मनामधे
कश्यामुळे घडतय याचा विचार करा जरा
येईल उत्तर शिक्षणाचा बाजार आता बंद करा
बंद करा शिक्षणाचा बाजार आता बंद करा
शिक्षणाच्या नावाखाली पैसा खान बंद करा
विद्यार्थ्यांचे बाप आज झाले कर्जबाजारी
त्यांच्या पैश्यावरती यांनी भाजली ना भाकरी
उच्चशिक्षिताच्या नाशिबात आली चाकरी
पास झाले सगळेच पन कहिनाच नोकरी
बाकी फिरले घेऊन डिग्री आणि
फिरून फिरून बसले घरी
नुकसान झाल कोणाच
वाढली न बेरोजगारी
बेरोजगार तरुण आज
करुण राह्यला गुन्हा
तुम्हीच सांगा कश्यामुळे
वाढत गेली गुन्हेगारी
फालतुगिरी चालू सारी
शिक्षणाच्या नावाखाली
काढ़ा यांच्या कानाखाली
विचारा ना जाब
एडमिशन घेतो तुम्ही देणार का जॉब
नसेल याच उत्तर तर एक काम करा
तुमच शिक्षणाच्या नावाच दुकान आता बंद करा
बंद करा शिक्षणाचा बाजार आता बंद करा
शिक्षणाच्या नावाखाली पैसा खान बंद करा
विद्येची मंदिरे आज पैश्याची खान झाली
सरस्वती लहान आणि लक्ष्मी महान झाली
8055
Rapboss
Comments are closed.